March 30, 2026

शिरूर प्रतिनिधी 

       दि . ०३/०८/२०२२ रोजी प्रवासी वाहतुक करणारी लक्झरी बस नं . एन.एल .०१ बी .२०९३ तीच्या पुढील बाजुस रजवाडी व मागील बाजुस सुनिता , झमकुडी असे नांव लिहिलेल्या बसमध्ये अवैधरित्या गुटखासाठा राजस्थान येथुन अहमदनगर मार्गे पुण्याकडे जाणार आहे . अशी खबर पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना मिळाल्याने सदर लक्झरी बस वर तात्काळ कारवाई करणेबाबत त्यांनी पोलीस पथकास पाचारण करून व्हिजन इंटरनॅशनल , इंग्लिश स्कुल येथे रोडच्या कडेला सापळा रचुन सदरची लक्झरी बस अहमदनगर बाजुकडुन पुण्याच्या दिशेने जात असताना दिसुन आल्याने तीस हाताचा इशारा करून थांबविले .  

सदर बस चालक , सहचालक व क्लिनर यांना सोबत घेवुन बसची डिक्की उघडुन चेक केली असता डिक्कीमध्ये एका पांढरे रंगाचे गोणीमध्ये वेगवेगळया पाऊचमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला व मानवी जिवीतास धोकादायक असलेला प्रतिबंधीत अन्नपदार्थ पान मसाला गुटखा मिळुन आला त्यामुळे सदरचा मुद्देमाल ताब्यात घेवुन तो तपासला असता त्यामध्ये १ ) ३०,२५० / – रु . किमतीचा विमल पान मसाला गुटखा व व्ही १ कंपनीची सुगंधीत तंबाखु असा माल व २ ) ६,००,००० / – रू . किंमतीची गुटखा वाहतुक करणारी लक्झरी ट्रॅव्हल्स बस नं एन.एल. ०१ बी . २० ९ ३ असा एकुण ६.३०.२५० / – रु . किमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आलेला आहे . सदरच्या छापा कारवाईमध्ये आरोपी ना 

१ ) सोहमलाल बौदुराम गुर्जर वय ४० वर्ष , रा . त्रिलोकपुरा , सिकर , राजस्थान

२ ) देवाराम भागुराम गुर्जर वय ४२ वर्ष ग . सदर ३ ) सुभाषचंद्र बन्सीधर गुर्जर वय २८ वर्ष , रा.दंतला , सिकर , राजस्थान 
४ ) दिनेशकुमार मंगलारामजी मेघवाल वय २१ वर्ष , रा . दौलतपुरा , जि.नागोर राजस्थान यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५५१ / २०२२ भा.द.वि.क ३२८,१८८ , २७२ , २७३ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ ( २ ) ( i ) २६ ( २ ) ( ii ) २६ ( २ ) ( iv ) २७ ( ३ ) ( d ) ३० ( २ ) ( a ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि कांबळे करीत असुन अटक आरोपींना आजरोजी मे . न्यायालयात हजर केले असता त्यांना दि . ०६/०८/२०२२ रोजीपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे . गुन्हयाचा पुढील अधिक तपास चालु आहे . सदरची कारवाई मा . पोलीस अधीक्षक सो , पुणे ग्रामीण अभिनव देशमुख ( भा.पो.से. ) , मा . अपर पोलीस अधीक्षक सो , पुणे विभाग मितेश घटट्टे व उपविभागीय पोलीस अधिकारी सो , शिरूर उपविभाग यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पो . नि .सुरेशकुमार राऊत , पो.ना. / २१८५ सुद्रिक , पो.ना. / २३३६ भवर , पो.कॉ. / २१७ पालवे , पो.कॉ. / २६३३ गायकवाड यांनी केलेली असुन यापुढे देखील अशाच प्रकारे प्रवासी वाहतुक करणारे ट्रॅव्हल्स किंवा इतर वाहनांचा वापर करून गुटखा वाहतुक करणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांनी गुटखा वाहतुक , विक्री , किंवा साठवणुक करू नये असे शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे .