शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिरुर तालुक्यातील २५ शिक्षक नेशन बिल्डर अवार्डने सन्मानित करण्यात आले.
शिक्रापूर रोटरी क्लबच्या वतीने तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, जि. प.सदस्या कुसुम मांढरे यांच्या हस्ते शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. शिक्रापूर रोटरीच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे हे नववे वर्ष असल्याची माहिती शिक्रापूर रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष वीरधवल करंजे व सचिव डॉ. मिलिंद भोसुरे यांनी दिली. नेशन बिल्डर अवार्डने सन्मानित करण्यात आलेले शिक्षक पुढीलप्रमाणे :- प्रतिभा चंद्रशेखर शिर्के (सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्यू. कॉलेज केंदूर),
संतोष मंडेराव झांजे (वाघाळे), संभाजी बबन कुटे, भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा, चंद्रशेखर भास्करराव काकडे (वडगाव रासाई), रेश्मा महंमदरफिक शेख (जि. प. प्राथ. शाळा लांडेवस्ती शिक्रापूर), मंदा प्रकाश लोखंडे (श्री भैरवनाथ माध्य व उच्च माध्य विद्यालय, करडे), रतन मंडलिक (शिक्रापूर), विवेक वसंत गायकवाड (न्हावरा), चंद्रकांत धोंडिबा भोजने (कोंढापुरी), भाऊसाहेब पांडुरंग चव्हाण (माध्यमिक विद्यालय सणसवाडी), तात्यासाहेब अमृता दरेकर (मांडवगण फराटा),
जयश्री रामदास विश्वास (जि. प. शाळा तळेगाव ढमढेरे नं.१), साधना गायकवाड (मुखई), संजय तुकाराम शेळके (विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर),
नवनाथ निचित (जांबुत), जगन्नाथ बापूराव कदम (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सादलगाव), बेबी तोडमल (शिरूर), मोमीन सबिया आरीफ (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिक्रापूर), दीपक खैरे (वाबळेवाडी), योगेश सुभाष रुके
(करंदी), देविदास शशिकांत कुंभार
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेगाव दुमाला), रवींद्र गणपत सातपुते (आर.बी.गुजर प्रशाला, तळेगाव ढमढेरे), सुरेश विठ्ठल शेळके
(भांबर्डे), धनाजी तुकाराम थोरात
(विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव म्हाळुंगी), सीमा भुमेश गवारी
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगांव ढमढेरे नं २). पुरस्कार वितरण कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम, शिक्रापूरचे उपसरपंच मयूर करंजे, शिक्रापूर रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष वीरधवल करंजे, सचिव डॉ. मिलिंद भोसुरे, माजी सचिव डॉ. मच्छिंद्र गायकवाड, रमेश भुजबळ, लधाराम पटेल, मनोहर परदेशी, प्रितम शिर्के आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव मांढरे यांनी केले तर राहूल चातुर यांनी आभार मानले.

