कवठेयेमाई कान्हुर मेसाई रोड हिवरे पिंपळे मार्गे शिक्रापूर पुणेस जातो . शिरूर तालुक्याला जाणेसाठीही हाच मार्गआहे . त्यामुळे रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते , त्यातच मागील काही महिन्यापासून कान्हुर मेसाई ते मलठण. कवठे येमाई ते कान्हूर मेसाई दरम्यान रस्त्याची खड्ड्यांनी चांळण झाली होती . असे असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत असल्याचे भास्करराव पुंडे यांनी सांगितले .
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचतआहे .वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने रस्त्यावर किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे खडी व डांबराऐवजी चक्क मातीमिश्रित मुरूमाने भरविले जात असल्याने वाहनधारका मधून नाराजी व्यक्त केली जात आहे .याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज असून हे खड्डे माती न टाकता डांबर टाकून बुजवावेत . अशी मागणी परिसरातील वाहनचालकांकडून होत आहे,


