सुनील भंडारे पाटील
केसनंद (तालुका हवेली) येथील तळेरानवाडी जानुबाई मंदिराच्या शेजारी
डांबरी रस्त्यावर पूर्ण वाढ झालेला मोठा बिबट्या दिसला, नागरिक भयभीत,
सध्या पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य
दिसून येत आहे, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी माणसांवर, पाळीव प्राण्यांवर
हल्ले होत आहेत, पाळीव प्राण्यांची शिकार देखील होत आहे,आता मात्र
बिबट्याने हद्दच पार केली आहे, पुणे शहर वाघोली लगत असणाऱ्या रहदारीचे गाव
केसनंद या ठिकाणी बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये, ग्रामस्थांमध्ये भीतीचे
वातावरण तयार झाले आहे,
शिवाय शहरालगतच्या गावामध्ये बिबट्याचे दर्शन
झाल्याने लोकांमध्ये आश्चर्याचे वातावरण तयार झाले आहे, आज सकाळी पहाटे चार
वाजता गावातील
समोर आला गाडीमध्ये बसलेले गणेश हरगुडे यांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट
करून बिबट्याला कॅमेरात कैद केले, या बिबट्याने तळेरानवाडी मधील वसंत
साहेबराव हरगुडे यांच्या म्हशीच्या गोठ्यामधील पारडू ची शिकार केली, आज
सकाळी वन खात्याचे वनपाल वायकर, सरकारी डॉक्टर शिंदे यांनी भेट दिली,
यावेळी केसनंद ग्रामपंचायत सदस्य धनंजय हरगुडे, शांताराम सावंत भाऊसाहेब
शिंदे, गोठ्याचे मालक वसंत साहेबराव हरगुडे, व गणेश हरगुडे आदी उपस्थित
होते, संबंधित बिबट्या पकडण्यासाठी वन खात्याने तातडीने पिंजरा लावावा अशी
मागणी केसनंद ग्रामस्थांकडून होत आहे अशी माहिती दक्षता समितीचे अध्यक्ष,
राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा महिला मंच अध्यक्षा,
शिवसेनेच्या कार्यकर्त्या अलकाताई सोनवणे यांनी दिली,
मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन झाल्याने,
लोकांमध्ये आश्चर्याचे व भीतीचे वातावरण आहे, गावामध्ये दिसलेला बिबट्या
पूर्ण वाढ झालेला असून, त्यापासून लोकांना भीती आहे, रात्री अपरात्री
घराबाहेर पडू नये, असे आवाहन केसनंद चे पोलीस पाटील पंडित आप्पा हरगुडे
यांनी केले आहे,


