March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
             कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथे वढु बुद्रुक रस्त्यालगत एका गल्लीमध्ये आज सकाळी एकजणावर अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला करून, त्याला गंभीर जखमी करून, त्याचे धडापासून शीर वेगळे करून खून केला,           

  याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6:00 च्या सुमारास कोरेगाव भीमा हद्दीतील वढू रोडच्या बाजूला गल्लीमधील इनामदार बिल्डिंगमध्ये रूम नंबर १मध्ये सुशांत अनिल करमरकर वय 46 वर्ष मूळ राहणार लाल बाजार कामगार पागा, जिल्हा ब्याकुडा, पश्चिम बंगाल याच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने सपासप वार करून ठार मारले, या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी शिक्रापूर पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय  तपासणीसाठी ससून रुग्णालय पुणे येथे पाठवला, आसपासच्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून घेण्यात आले असून,

घटनास्थळी उपविभागीय पोलीस आयुक्त यशवंत गवारे,पुणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यांनी पाहणी केली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतकरे, सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश थोरात, पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे, दांडगे, होनमाने, शिवणकर, विकास पाटील, नागरगोजे, यांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरोधी गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू आहे,