March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
              अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन, मराठी फाल्गुन महिन्यातील अमावस्या हा दिवस संपूर्ण देशात धर्मवीर दिन घोषित करण्यात यावा तसेच इतर मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे,         

     धर्मपीठ, शक्तिपीठ, बलिदान पीठ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (तालुका शिरूर), श्रीक्षेत्र तुळापूर (तालुका हवेली) तसेच तालुका, जिल्हा, राज्य, आणि देशांमध्ये धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा फाल्गुन अमावस्येला बलिदान दिन करण्यात येतो, हा बलिदान दिन शासनाने “धर्मवीर दिन” म्हणून घोषित करावा त्याचप्रमाणे गोहत्या, लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह  संपूर्ण देशात लागू करण्यात यावा यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा चे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले असून, 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता लाल महाल पुणे येथून मोर्चा निघून पुणे जिल्हा परिषद कार्यावर धडकेल, एक दिवस धर्मासाठी या संकल्पनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त हिंदूनी एकत्र येऊन या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे,