March 30, 2026
गावठी हातभटटी दारुच्या अड्डयाचे लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडुन करण्यात आले समुळ उच्चाटन.!

 ( ८८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केल नष्ट )
लोणी काळभोर प्रतिनिधी 
      शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुदध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दशहत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.  

 यामुळे अवैध रित्या दारू,गुटखा,कोयता गँग,गुन्हेगार,यांचे धाबे दणाणले आहेत.  रितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर,  संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर, यांच्या आदेशाने व त्या अनुषंगाने मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०५,  विक्रांत देशमुख  यांनी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करणे बाबतचे आदेश देऊन सदर कारवाई बाबत मार्गदर्शन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील आधिकाऱ्यांना केले. त्यानंतर दत्तात्रय चव्हाण, व पोनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे यांनी सदर अवैध धदयांबाबत माहिती घेतली ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जात नाही अशा ठिकाणी जंगलामध्ये निर्जनस्थळी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे काम राजरोसपणे चालू असलेबाबत त्यांना माहिती मिळाली.सदर बातमीचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कडील अधिकारी, अंमलदार, तसेच परिमंडळ ४ व ५ कडील आ सी पी पथक व उत्पादन शुल्क विभागाकडील अधिकारी व स्टाफ यांचे सोबत चर्चा करून नियोजनबद्ध दोन पथके तयार करून लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात सोरतापवाडी, शिंदवणे, लोणीकाळभोर मांडाळमळा येथील अवैध गावठी हातभट्टी दारु भट्टीवर धडक कारवाई करुन काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे येथील गावठी हातभट्टीवर कारवाई करून जमिनित खड्डे करून अंदाजे चार हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे चार पत्र्याचे भांडे असे अंदाज ४४०००/- रू किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट केला. त्याचवेळी दुस-या पथकाने मांडाळमळा, रूपनरवस्ती, लोणी काळभोर या ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी दोन पञ्याचे टाक्यामध्ये तसेच जमिनीत खड्डा करून काळे रंगाची ताडपत्री अंथरून त्यामध्ये साठवलेले अंदाजे ३००० लिटर गुळ, तुरटी व पाणी मिश्रित असलेले कच्चे रसायन, हातभट्टीसमोर पडलेली जळावू लाकडे, पञ्याच्या टाक्या इत्यादी साहित्य पोलीसांनी जागिच नष्ट केले आहे. याप्रमाणे कारवाई करून अंदाजे एकुण ८८,०००/- रुपये किंमतीचा अवैध दारुसाठा व दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन व साहित्य जेसीबी मशिनचे सहाय्याने नष्ट करण्यात आले आहे. सदर कारवाई दरम्यान गावठी हातभट्टी चालवणारे इसम नामे १) राहुल व्यंकट राठोड, वय २७ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे, ता. हवेली, जि. पुणे २) पंकाबाई व्यंकट राठोड, वय ५२ वर्षे, धंदा घरकाम, रा. काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे, ता. हवेली, जि. पुणे ३) जयश्री कांतीलाल राठोड, वय ३५ वर्षे, रा. काळेशिवार कॅनल जवळ, शिंदावणे, ता. हवेली, जि. पुणे, ४) सोन्या उर्फ निखिल नंदू घायाळ, वय २६ वर्षे, रा. कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे. यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक  दत्तात्रय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील पोलीस करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगीरी रीतेश कुमार, पोलीस आयुक्त  पुणे शहर, संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त  पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त , पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त , परिमंडळ – ५, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त  हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक,  सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पोउपनि वैभव मोरे, पोहवा /  गायकवाड, पो. हवा बोरावके, पोना /  नागलोत, पो.ना  साळुंखे, पो.ना जाधव, पो.ना. राठोड, पोशि पवार, पोशि कुदळे, पोशि/ शिरगीरे, पो.शि  विर, मपोशि फणसे, लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, आरसीपी ४ व आरसीपी ५ तसेच राज्य उत्पादन शुल्क जी विभाग पुणे यांचेकडील अधिकारी व स्टाफ यांच्या पथकाने केली आहे.