March 30, 2026
पुणे विशेष प्रतिनिधी 
             कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील पुणे नगर महामार्गालगत असणाऱ्या सावली लॉजवर शिक्रापूर पोलीस स्टेशनने अचानक छापा टाकला, त्यामध्ये बनावट ग्राहकाच्या साह्याने एक अल्पवयीन मुलगी, तसेच दोन महिलांची सुटका करण्यात आली,    

  याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी फिर्याद दिली आहे, या संदर्भात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 1) सचिन पंडित विधाते, राहणार तुळजाभवानी मंदिर, बालाजी नगर धनकवडी पुणे 2) शंकर लाल बहादूर चेत्रे, राहणार सावली लॉज कोरेगाव भीमा, तालुका शिरूर जिल्हा पुणे,3) अमोल रामदास डहाळे, राहणार सावरगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड, या तिघांना अवैद्य वेश्या व्यवसाय प्रकरणी कारवाई करून अटक करण्यात आली आहे,

               सावली लॉजवर अवैध वेश्या व्यवसाय चाललेला असल्याचे माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली असता त्यांनी तातडीने पथक तयार करून, संबंधित ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली, लॉजच्या काउंटर जवळ वेश्याव्यवसाय करून घेणारे तिघेजण तसेच एक अल्पवयीन 16 वर्षांची मुलगी, दोन महिला सापडल्या, यावेळी बनावट ग्राहकाने लॉज चालकाला संशय येऊ न देता वेश्याव्यवसाय करणारी मुलगी अगर महिला मिळतील का? त्यांचे पैसे काय असतील ते मी देतो, असे सांगितल्यानंतर काउंटर वरील इस्मानी होय असे सांगून आत मधील दोन महिला व एक मुलगी बोलावून सध्या एवढ्या आहेत या तुम्हाला चालतील का असे विचारले, बनावट ग्राहकाने होय असे म्हणून रेट फायनल झाल्यानंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आले, सदरची कामगिरी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार होळकर, पोलीस हवलदार शंकर साळुंखे यांनी केली,