March 30, 2026
लोणी काळभोर अनिकेत मुळीक 
        ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग्स माफिया ललित पाटील नेपाळ मध्ये असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाल्याने विशेष पथक तेथे रवाना झाले आहे. 

     पाटील याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकासह आणखी दहा पथके ललित पाटीलच्या मागावर आहेत.

पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आल्यानंतर पाटील नेपाळमध्ये पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून. लतील पाटीलचा शोध घेण्यात येत आहे.

             पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यासाठी देशातील अनेक तस्करांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात उघड झाली असून. दुबई, थायलंड आणि मलेशिया या देशात ललित पाटील हा मेफेड्रोन पाठवित होता. मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरातील शिंदे गावात पाटीलचा भाऊ भूषण याच्या कारखान्यावर छापा टाकला. मुंबई पोलिसांनी ३०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे.

       या कारवाईनंतर भूषण उत्तर प्रदेशात पसार झाला. गोरखपूर भागात नेपाळ सीमेजवळ भूषण असल्याची माहिती तांत्रिक तपासात मिळाल्यानंतर पुणे पोलिसांचे विशेष पथक तेथे रवाना झाले. एका लॉजमधून भूषण आणि अभिषेकला ताब्यात घेण्यात आले. दोघे नेपाळला पसार होण्याच्या तयारीत होते. उत्तर प्रदेशातून पाटील नेपाळमध्ये पसार झाल्याचा संशय पोलिसांना आहे.