March 30, 2026
लोणी काळभोर अनिकेत मुळीक 
         ड्रग्स माफिया ललित पाटील पोलिसांचा हातावर तुरी देऊन पसार झाला आहे.या प्रकरणी 9 पोलिसांना निलंबित केले आहे.ससून रुग्णालयात नक्की चालय काय? ससून रुग्णालय ठरते गुन्हेगारांचे आश्रयस्थान का? पाहा भरारी न्यूज चा special report….

        ससून रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील फेरफटका मारण्याच्या नावाखाली रुग्णालयातून बाहेर पडून तारांकित हॉटेलमध्ये मुक्कामही करायचा,’ अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. ‘ससून’मधून पसार झालेल्या पाटीलचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.ससून रुग्णालयाबाहेर 2 कोटींचे ड्रग्स जप्त केल्यानंतर रुग्णायल प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्यभरात कल्याण मुंबई मटका चालवणारा मटका किंग विरल सावला हा उपचाराच्या नावाखाली पुण्यातील ससून रुग्णालयात आहे. तब्बल 274 दिवस तो तळ ठोकून आहे. केवळ विरलच नाही तर गंभीर गुन्ह्यातील 9 आरोपी ससूनच्या कैदी वॅार्डमध्ये मजेत राहताहेत. त्याच कारण आहे ससून रूग्णालयाचं प्रशासन. या कैद्यांना वेगवेगळ्या उपचाराच्या नावाखाली या वॅार्डमध्येच ठेवण्यात येत आहे.पुण्यातले कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातले कुख्यात गुन्हेगार हे येरवाडा कारागृहात ठेवले जातात. त्यांना वैद्यकीय तक्रारी असतील तर त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार केले जातात. पण या सुविधेचा गुन्हेगार आणि ससून रूग्णालयाच प्रशासन मिळून गैरवापर करत असल्याच आढळून आलं आहे. 

        सध्याच्या घडीला कारागृहात 9 कुख्यात गुन्हेगार आहेत. त्यांचा कारागृहातला मुक्काम वाढतोस कसा असा प्रश्न आहे. सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल 274 दिवस या वॅार्डमध्ये मटकाकिंग विरल सावलाचा मुक्काम आहे. कोल्हापूरचा मटका किंग सलीम मुल्ला याच्यावर कोल्हापूर पोलिसानी मोक्का अंतर्गत कारवाईत केली होती. या गुन्हात विरल सहआरोपी आहे.

ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयातील दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्यानंतर ससून रुग्णालयात पाहुणचार घेणाऱ्या कैद्यांची यादी आता समोर आली आहे. या कैद्यांना जास्त काळ रूगाणालयात निर्धोक राहता यावं म्हणून ससून रूग्णालय प्रशासनाचे प्रमुखच प्रयत्न करत असल्याच समोर आलं. फरार आरोपी ललित पाटील सापडल्यानंतर त्याची खातीरदारी करणाऱ्या कुणालाच सोडणार नसल्याच पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.

      ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता असलेले संजीव ठाकूर हे मात्र या प्रकरणानंतर दोन दिवसापासून माध्यमांपासून पळ काढताहेत. ललित पाटील याच्यावर तेच उपचार करत असल्याचंही समोर आलंय. हे सगळं प्रकरण तापल्यानंतर आता ससून रूग्णालय प्रशासन मूग गिळून गप्प आहे. पण फार काळ ही परिस्थिती राहणार नाही, असं चित्र आहे. कारण ड्रग तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा देखील या प्रकरणी असल्याचे उघडकीस झाल्याने त्याला अयोध्येतून पकडले आहे.पुणे पोलिसांनी याप्रकरणात कुणालाच सुट्टी मिळणार नसल्याच स्पष्ट केलं आहे.