सुनील भंडारे पाटील
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 1162/ 2022, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम सात नुसार लोकसेवक स्वराज अनंत पाटील पद सहाय्यक पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर, यांच्यावर लाच मागणी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे,
एका 38 वर्षीय असलेल्या तक्रारदार यांचे पत्नी व सासरे यांच्या विरोधात जागा वादा च्या संबंधाने आलेल्या तक्रार अर्जावरून कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी लोकसेवक सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी दोन लाखाची लाच मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती,
सदर तक्रारीची पडताळणी केली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी दोन लाख रुपयांची लाच मागणी केली म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, पुढील तपास लाच लू चपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली,

