शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आले.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील गुजर प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका रत्नप्रभा देशमुख, तुकाराम नरके, अनिल ढमढेरे, अविनाश ढमढेरे, काळुराम दरेकर, जयकुमार गुंदेचा, उद्योजक कुंडलिक भुजबळ तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे आदींनी शुभेच्छा दिल्या.

