शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
शिक्रापूर परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्रापूरसह परिसरातील तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, कोरेगाव भीमा, धानोरे, कासारी, जातेगाव, मुखई, कोंढापुरी, निमगाव म्हाळुंगी, दहिवडी, पारोडी, न्हावरे, करडे, उरळगाव आदी ठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईदगाह मैदानावर तर पावसामुळे कांही ठिकाणी मस्जिदमध्ये नमाज पठण केले.
शिक्रापूर येथील जामा मस्जिदमध्ये बकरी ईद निमित्त नमाज पठण करताना मुस्लीम बांधव.(छाया : नमीरा डिजिटल)
नमाज नंतर सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्रापूर येथील जामा मस्जिदमध्ये नमाज पठणाचे चोख नियोजन करण्यात आले होते. सकाळी साडेसहा, सात व साडेसात वाजता नमाज पठण करण्यात आले. नमाज पठणाचे नियोजन शिक्रापूर जामा मस्जिद ट्रस्टचे सिराजभाई शेख, हारूनभाई इनामदार, मुन्नाभाई तांबोळी, इमरानभाई तांबोळी, अयुबभाई तांबोळी, शाहरुखभाई इनामदार, सादीकभाई तांबोळी यांनी सुयोग्य असे नियोजन केले होते. शिक्रापूर पोलिसांनीही पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


