March 30, 2026

शिक्रापूर : प्रा. एन.बी मुल्ला 

 
      तळेगाव ढमढेरे येथील राजेंद्र अनंत कऱ्हेकर यांची राष्ट्रीय पोलीस
मित्र संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय
अध्यक्ष गवते यांनी नुकतेच कऱ्हेकर यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

 
     
 तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील राजेंद्र कऱ्हेकर यांच्या सामाजिक
कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांचे या निवडीबद्दल विविध
क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.