सुनील भंडारे पाटील
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली, तरीदेखील आठवडाभर पडत असलेल्या संततधार पावसामुळे लोकांमध्ये,नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे, शेतकरी वर्ग सुखावला असून, भीमा नदीला आलेल्या पुरामुळे वर्षभराचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे, शिवाय नदीमधील कांजवण वनस्पती पूर्णपणे वाहून गेली असून, इतर घाणघून देखील साफ झाली आहे,
याचा फायदा निश्चितच जलचर प्राणी, आजूबाजूच्या शेतीला होणार आहे, गेल्या चार-पाच दिवसांपासून भीमा नदीला पूर येऊन, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे, हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नदीकाठच्या गावात बिल्डिंगच्या टेरेसवर लोक आनंद घेत आहेत, नदीला आलेल्या पुरा पासून कुठलाही धोका होऊ नये, जीवित हानी होऊ नये, यासाठीच्या आवाहन लोकांना करण्यात येत आहे,
भीमाशंकर तालुका आंबेगाव येथून उगम पावलेली नदी पुढे खेड, शिरूर, दौंड,इंदापूर,असे अनेक तालुक्या मधून पुढे – पुढे नदीचे पात्र मोठे होत गेले आहे, नदीच्या प्रवासामध्ये भीमा, भामा, इंद्रायणी, मुळा मुठा संगम होत काठच्या अनेक गावांमधील सजीव सृष्टी टिकवली आहे, गाव गावच्या ठिकाणचे बंधारे मोकळे केल्याने पुराचे पाणी सुसाट घावत आहे,




