March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
         सहल म्हटले की, कोणाला फिरायला आवडत नाही.  यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने निसर्ग कसा फुलून गेला आहे; असाच एक निसर्ग पाहण्याचा मोह आवरला नाही…. तो म्हणजे भांबर्डे (ता.शिरूर )  येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांनी इच्छा व्यक्त केली आणि मग काय… मुख्याध्यापक मारुती कदम यांनी लगेच विद्यार्थ्यांची इच्छा पुरविली.

भांबर्डे गाव पर्यटन क्षेत्रासाठी सर्वांना खुणावतंय; या गावातील शेती, मळाबाई देवस्थान, गायकवाडवाडी येथील  ३ एम. क्यूब पाणीसाठा असणारा तलाव, निसर्गातील विविध प्रकारची झाडी.  यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांस परिसर अभ्यास करण्यासाठी शाळेची सहल काढली जात असल्याचे मुख्याध्यापक मारुती कदम यांनी सांगितले. गायकवाडवाडी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून तलावाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी बराच वेळ पोहण्याचा, जेवणाचा आणि पाण्यावर तरंगणाऱ्या पक्षांचा आनंद घेतलयाचेही मुख्याध्यापक

मारुती कदम यांनी सांगितले.
तलावातून भांबर्डे, करडे ,आंबळे आणि दहिवडी या गावांना शेतीपंपाद्वारे शेतीला पाणीपुरवठा केला जातो .त्यामुळे या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे याप्रसंगी बोलताना प्रगतशील शेतकरी
शिवाजी वीर यांनी सांगितले. भांबर्डे गावच्या परिसराचा अभ्यास करताना मानवी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी समजल्या. अशा निसर्गमय वातावरणात पूर्ण दिवस कसा गेला हे समजलंच नाही असे मत याप्रसंगी वेदिका जगदाळे या विद्यार्थिनीने व्यक्त केले. या सहलीचे नियोजन शिक्षक उत्तम गाडे, सुरेश शेळके, बाळासाहेब दिवेकर आणि सविता शिंदे यांनी केले. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे, उपाध्यक्ष मच्छिंद्र पवार, सचिव बापूराव पवार, संचालक नाथू वीर, हनुमंत पवार, उषा पवार आणि ग्रामस्थांनी केले.