March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

              लोणीकंद (तालुका हवेली) येथील पुणे नगरमहामार्गावर घाटमाथ्याच्या ठिकाणी अनेक लहान मोठे अपघात घडली असल्याने शिवाय अनेकांचा जीव या ठिकाणी घेतला असल्याने हा गंभीर अपघाताचा स्पॉट बनला आहे,           

पुणे नगर महामार्गाचे रस्त्याचे काम नुकतेच झाल्याने
मालवाहतूक गाड्या, पब्लिक बसेस, कार, दुचाकी गाड्या यांचा वेग वाढला असून
संबंधित ठिकाणी सतत अपघात होत आहेत, शिवाय अनेक वर्षांपासून लोणीकंद येथील
असंख्य खडी क्रशर मशीन साठी चे दळणवळण, बेकायदेशीर शेकडो चुका करणारे खडी
वाहतुकीचे डंपर राजरोसपणे अचानक महामार्गावरील वाहनांचा विचार न करता येत
आहेत बऱ्याचदा या कारणामुळेच अपघात झालेत, तसेच या ठिकाणी यू टर्न असल्याने
देखील अपघाताला निमंत्रण मिळत आहे, 

खडी क्रशर झोनच्या बाजूने पाझर
तलावावरून येणाऱ्या गाड्या झाडी, तसेच खड्ड्यातून अचानक वरती महामार्गावर
येताना बऱ्याचदा असे होते की वाहन चालकांना दिसत नाहीत, तसेच पाझर तलाव
पासून वरती येणारा चढ पास करण्यासाठी चाळीस टनाच्या हायवा डंपर चढ-पास
करण्याच्या धुंदीत वेगात महामार्गावर येत आहेत, हे धोक्याचे आहे
आत्तापर्यंत संबंधित ठिकाणी अपघात होऊन देखील कोणतीच उपाययोजना होत नाही,
खडी क्रशरच्या व्यवसायावर बड्या नेत्यांचा वरद हस्त असल्याने यापुढे देखील
अपघात होऊन द्यायचे का? लोकांचे जीव जाऊन द्यायचे का? अशा स्वरूपाची चर्चा
नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे, संबंधित ठिकाणचा युटन रस्ता बायपास
तातडीने बंद व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे,