March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

             महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने चक्क दुचाकी गाडीला चालकाने सीट बेल्ट  लावला नसल्याचे चलन पाठवून 200 रुपये दंड केल्याची घटना घडली असून आता यावर हसावे कि रागवावे अशी अवस्था गाडी मालकाची झाली आहे, ऐकावे ते नवलच..!

              पुणे जिल्ह्यामधील एका नामांकित उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रिन्सिपल असणारे व्यक्तिबाबत ही घटना घडली असून याबाबत महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे, 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता, अमरावती भुसावळ असे लोकेशनला एक्टिवा गाडी नंबर MH12NM0802 ही गाडी कधीच त्या ठिकाणी गेली नसताना चक्क या दुचाकी गाडीला सीटबेल्ट लावले नसल्याचे चलन कोरेगाव भीमा, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील व्यक्तीला प्राप्त झाले आहे, त्यांनी हे चलन पाहिले असता प्रथमतः त्यांना चकितच वाटले शिवाय त्यांनी सीट बेल्ट नसल्याची 200 रुपये एवढी रक्कम भरून पण टाकली,

                महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस, पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले असे चलन काढणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून संबंधित गाडी अमरावती भुसावळ या ठिकाणी गेली नसताना तसेच दुचाकीला शीट बेल्ट नसल्याचे चलन काहीच संबंध नसणाऱ्या गाडी मालकाला कसे पाठवले एकंदरीत महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे, यावर हसावे का रागवावे अशी अवस्था झाली आहे, आता महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस खाते संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे,