March 30, 2026

आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख

          श्री न्यानेश्वर महाराज माऊलींच्या मंदिरानंतर आळंदीच्या वैभवात भर पाडणाऱ्या हजेरी मारुती मंदिराचा कोरीव कामाचे उद्घाटनासाठी आळंदी नगरीचे माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर पाटील यांनी भारत देशाचे भूमिपुत्र शरदचंद्रजी पवार यांना निमंत्रित केले होते.

         मुख्य मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यानंतर, बाहेरील सभा मंडपाचे दगडी कामाचा शुभारंभ  राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कर यांचे शुभ हस्ते झाले. शरद पवार नावाचं वलय राम जनतेच्या पासून अजूनही हटलेले नाही याची प्रचिती आळंदीत आली. ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिराच्या दगडी कोरीव कामाच्या उद्घाटनासाठी मोठ्या संख्येत ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवार साहेबांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आळंदी नगरीचे माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर पाटील यांनी मारुतीरायाच्या सभा मंडपात शरद पवार यांना चांदीची गदा भेट दिली. या चांदीच्या गदेचे विशेष आकर्षण दिसून आले. हजेरी मारुती मंदिरात पवार साहेब येणार म्हणून ढोल ताशांचा निनाद करण्यात आला. फटाक्याच्या आतिषबाजीने परिसर दणाणून सोडला.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे. माजी नगरसेवक डीडी भोसले, प्रशांत कोरडे,श्रीधर कुराडे,सागर बोरंदिया,वासुदेव गुंडरे,दिलीप कुराडे,सचिन गिलिबिले,प्रकाश कुराडे,दिनेश घुले,आनंदराव मुंगसे,मृदुल भोसले,बाबुलाल गुंडरे, चेतन कोराडे, नंदकुमार वडगावकर,नितीन साळुंखे, प्रियेश रानवडे,सागर कुराडे, सतीश कुराडे,सौरभ गव्हाणे, तसेच आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते हजेरी मारुती मंदिरात हजेरी लावल्यानंतर शरद पवार यांनी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात दर्शन घेतले यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी त्यांच्या समवेत पीडीसी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश मस्के राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार गट हिरामण सातकर राजाभाऊ चोपदार ज्ञानेश्वर वीर व मान्यवर उपस्थित होते.