March 30, 2026
सुनील भंडारे पाटील 
                 जातेगाव बुद्रुक (तालुका शिरूर) येथे आज ता 23 रोजी मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व तीन हजार रुपये रोख रक्कम असा एक लाख 23 हजार रुपये किमतीची चोरी केली असून 76 वर्षीय महिलेचा चोरट्यांनी या घटनेत खून केला आहे, या घटनेमुळे शिरूर तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे,

                शिरूर तालुक्यामधील अरणगाव येथील दरोड्याची घटना अजून ताजी असताना आता दुसऱ्यांदा जातेगाव बुद्रुक येथे झालेले या दरोडेच्या घटनेमुळे शिरूरकरांच्या अंगावर आता काटा येऊ लागला आहे, अरणगाव येथील दरोड्या मध्ये देखील एका वृद्ध दांपत्याचा खून करण्यात आला होता, या घटनेनंतर आता जातेगाव बुद्रुक येथे मोठ्या दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, 

                 याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सारिका अमर इंगवले यांनी फिर्याद दीली असून काल रात्री साडेदहा वाजण्याचे सुमारास फिर्यादी व त्यांचा मुलगा नवीन घरी झोपण्यासाठी गेले असता त्यांच्या सासूबाई 100 मीटर अंतर असणाऱ्या जुन्या घरी झोपल्या होत्या, या घराचा लाकडी दरवाजा हवा येण्यासाठी उघडा होता तसेच बाहेरील सेफ्टी दरवाज्याला बाहेरून कुलूप लावले होते, त्यानंतर आज तारीख 23 रोजी सकाळी सकाळी 6:00 वाजण्याची सुमारास फिर्यादी नवीन घराकडून जुन्या घराकडे गेले असता दरवाज्याला कुलूप दिसले नाही, त्या दरवाजा उघडून आत मध्ये गेले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते, त्यांनी सासूबाईला आवाज दिला असता कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही, जवळ जाऊन पाहिले असता त्यांची कुठली हालचाल नव्हती, डोक्यामधून अंथरुणावर रक्त पडलेले दिसले, तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले होते, 
                   धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून खून करण्यात आला असून या दरोड्यामध्ये श्रीमती कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले वय ७६ वर्षे असे मृत्यू पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे, तसेच गावातील मोहन रघुनाथ तांबे, दत्तात्रय शिवाजी फणसे यांच्या घरी देखील चोरट्यांनी चोरी केल्याचे उघड झाले आहे, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार करत आहेत,