दामू आण्णा यांना मिळालेला आदर्श पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याला मिळालेला न्याय … सुभाष आण्णा उमाप ..माजी सभापती पंचायत समिती शिरूर
शिरूर विशेष प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील माजी सरपंच दामुशेठ धोंडीबा घोडे यांना संजीवनी शेती व शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांत सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा,सांस्कृतिक, उद्योग,व्यवसाय अशा क्षेत्रामधून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील गुनिजन व्यक्तींचा अभ्यास करून राज्यस्तरीय शिवछत्रपती संजीवनी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिवछत्रपती गुणीजन गौरव महासंमेलन २०२२ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा संगमनेर येथे एकवीरा फाऊंडेशन च्या संस्थापिका जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व दिपकृष्ण ग्रामीण सहकारी बँकेचे चेअरमन समाजश्री दिपक दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
दामुशेठ घोडे यांनी दहा वर्षे तर त्यांची पत्नी अरुणाताई यांनी पाच वर्षे असे सलग पंधरा वर्षे याच उभयंता ने टाकळी हाजी चे सरपंच पद भुषविताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनसामान्यांच्या प्रश्र्नाबरोबर गावच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.


