गुणवंतवाडी येथील गिरमकर वस्ती येथे शेतकरी सोमनाथ दत्तात्रय गिरमकर हे रोजच्याप्रमाणे आपल्या गोठ्यात मेंढ्या बांधून घरात झोपले होते पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान अचानक आवाज झाल्याने जाग आली असता गोठ्यामध्ये दोन मेंढ्या जखमी अवस्थेत पडलेल्या दिसल्या
ही घटना सोमनाथ गिरमकर यांनी तात्काळ माजी सरपंच अनिल करपे यांना सांगून घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती वनसेवक नवनाथ गांधले व वनरक्षक विशाल चव्हाण व पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर रोहिदास बोऱ्हाडे यांच्याशी संपर्क करून सविस्तर सांगितली त्यावेळी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला
पंचनाम्यादरम्यान बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी उपसरपंच पांडुरंग गव्हाणे, ग्रा.सदस्य.सुभाष बहिरट, मनोज गव्हाणे, धुलचंद वाघमोडे, सुखदेव जगदाळे, वाल्मीक गिरमकर यांनी केली. सदर घटनेने गुणवंतवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.



