आपल्या आयुष्याचे शतक उलटून देखील संबंधित पुल आजही तहाट मानेने उभा आहे, सुंदर, रेखीव, आकर्षक कमानी दगडी बांधकाम हे जुन्या काळातील इंजीनियरिंगचा महत्त्वाचा नमुना आहे, आजची इंजीनियरिंग कला त्यापुढे फिकी आहे, वास्तविकता अशा जुन्या पुरातन वास्तूचे काळजी करणे जतन करून ठेवणे ही गरज असताना टोरेंट सीएनजी गॅस कंपनीच्या मनमानी कारभारामुळे या पुरातन वास्तुला गालबोट लावले जात आहे, या पुलाच्या बगलेला पूर्व बाजूच्या बाजूने मोठी ड्रिल मशीन लावून नदीच्या आरपार ऐतिहासिक विजयस्तंभ च्या बाजूला खोलवर ड्रिल मारण्याचे काम चालू आहे, त्यामुळे पुलाच्या एकदम जवळ चाललेल्या या कामामुळे पुलाच्या पायाला धोका होऊ शकतो याची सर्व चर्चा सर्वत्र चालू आहे,
सुमारे 115 वर्षानंतरही आपल्या दणकटपणाची शाश्वती आजही हा पुल देत आहे, पुणे शहरापासून राज्याच्या पूर्व भागातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारा या पुलावरील महत्त्वाचा मार्ग असून लहान मोठी हजारो वाहने या पुलावरून प्रवास करतात, टोरेंट गॅस कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे या ऐतिहासिक ब्रिटीशकालीन पुलाला मात्र धोका होऊ शकतो, याकडे मात्र पेरणे ग्रामस्थांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे,
