March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

               कोरेगाव भीमा (तालुका शिरूर), पेरणे (तालुका हवेली) येथील ऐतिहासिक ब्रिटिश कालीन पूल तसेच ब्रिटिश कालीन ऐतिहासिक वास्तू विजयस्तंभ परिसरात टोरेंट कंपनीच्या मनमानी कारभारामुळे या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंना धोका असल्याचे विजय स्तंभाचे इन्चार्ज खंडोजी माळवदकर यांचे वंशज ॲडव्होकेट रोहन माळवदकर( जमादार) यांनी सांगितले, शासनाने ताबडतोब हे काम बंद करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली,

               कोरेगाव भीमा गावचे वैभव तसेच इतिहासामध्ये अनन्य साधारण महत्व असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू राज्य तसेच जगभरातून लोक या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात अशा विजय स्तंभाच्या परिसरात टोरेंट कंपनीच्या मन मानिकारभारामुळे धोका असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, तसेच सद्यस्थितीत चाललेल्या भीमा नदी मधून पाईपलाईन आरपार करण्यासाठी ड्रिल मारण्याचे काम चालू आहे, त्यामधून काही समाजकंटक, आतंकवादी, काही टाकू शकतात, देशाच्या काना कोपऱ्यातून लोक येत असतात, या माध्यमातून काही पण होऊ शकते,

विजय स्तंभास तसेच आमचे घर उध्वस्त करण्याचा कट रचू शकतात, याचा दोष देखील ग्रामस्थ व स्थानिकांना दिला जाईल, या संदर्भात मी  पुणे जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांना तक्रार करणार असून तोंडी कित्येक वेळा तक्रार केलेली आहे, शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून संबंधित काम तातडीने थांबवावे अशी मागणी माळवदकर यांनी यावेळी केली,