March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
              आज अहिल्यादेवी जयंती राज्यात सर्वत्र साजरी होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मोठी घोषणा केली अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा या महत्त्वाच्या मुद्द्याला अखेर पूर्णविराम देत मुख्यमंत्री शिंदे यांनी अहमदनगरचे नाव बदलून ” अहिल्यानगर” केल्याची घोषणा आज केली,         

     अहमदनगर मधील चौँडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बोलताना ही घोषणा केली, आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून प्रत्यक्ष या ठिकाणीच अहिल्यादेवी जयंती निमित्त कार्यक्रमात ही घोषणा करणे म्हणजे आमचे भाग्यच आहे, पुढे शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले, हे नाव देताना आम्हाला खूप आनंद होत आहे असे शिंदे यांनी म्हटले, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की अहिल्यादेवी होळकर या शूरवीर योद्धा होत्या त्या नसत्या तर वाराणसी काशी दिसली नसती, त्यांनी सर्वांना समानतेची वागणूक दिली, या नामकरणाबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत अहिल्यादेवी होळकर यांचे विचारांचा वारसा यापुढे सुरू राहील, मुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेचे राज्यातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे,