सणसवाडी (ता. शिरूर) येथे आज सकाळी रस्त्याच्या कडेला एक मृतदेह असल्याची खबर पोलीस स्टेशनला मिळाली,त्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पीएसआय अमोल खटावकर हे सहकाऱ्यासमवेत येऊन पाहिले असता हायवे लगत गवारी पेट्रोल पंपाच्या पलीकडे चारीत एक बॉडी पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसली
खून करून ओळख न पटावी यासाठी पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील ती बॉडी खून करून रात्रीच फेकून दिली असावी. असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे, महिला किंवा पुरुष याचाही उलगडा झाला नाही .
पोलीस पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ती ससून हॉस्पिटल येथे पाठविली असून पोस्टमार्टेम नंतरच खुलासा होईल . दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल खटावकर करत आहेत,

