March 30, 2026
लोणी काळभोर अनिकेत मुळीक 
       लोणी काळभोर (तालुका हवेली) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा जुने पोस्ट ऑफिस,पृथ्वीराज कपूर हायस्कूल समोर, ग्रामपंचायत लोणी काळभोर ने ठराव मंजूर करू धनगर समाज साठी जागा देण्यात आली.     

लवकरच येथे शुशोभीकरण करून सभा घेण्या साठी मंडप बांधण्यात येणार आहे. अहिल्यादेवी यांची जयंती गावांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनातर्फे ,धनगर समाजा मार्फत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. दुचाकी वाहन फेरी, तसेच सायंकाळी ढोलताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

       मल्हारराव होळकर यांच्या उत्तराधिकारी म्हणून १७६७ ला अहिल्याबाई स्वतंत्र राज्यकर्त्या झाल्या. स्वराज्यातील लोकांना मदत करून स्वराज्य सुखी व संपन्न ठेवण्यात अहिल्याबाईंची ख्याती होती. शेतजमीचे वाटप दरोडेखोरांचा योग्य बंदोबस्त., न्यायदान अशे अनेक प्रज्यावत्सल निर्णय अहिल्याबाई होळकर या लोकमातेनें घेतले. त्यांची जयंती संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
      एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी त्यांचे नाव लिहिले गेले आहे. अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र वाचल्यानंतर स्त्री शक्ती किती महान आहे, ती आपल्या आयुष्यात काय करू शकते याचे उदाहरण आपल्याला मिळेल. जीवनात कितीही संकटे आली तरी त्यांना कसे सामोरे जायचे हे अहिल्याबाईंच्या जीवनातून शिकले पाहिजे. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संकटांचा सामना केला पण त्यांनी कधीच हार मानली नाही.अशा मातेस विनम्र अभिवादन.