त्यानुसार या गावांमधील हरकतींवर १९ ते २६ जुलै या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही सुनावणी होणार आहे.
पीएमआरडीएने गेल्या वर्षी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. या आराखड्यावर ६० हजार हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १६४ गावांमधील २८ हजार हरकतींवर सुनावणी घेण्यात आली आहे. आता उर्वरित गावांमधील हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम सुरू आहे.,कुसगाव बु. – १९ जुलै, मळवली, कार्ला, डोंगरगाव, देवघर आणि वर्सोली – २० जुलै, औंढे खु, देवळे, भाजे, बोरज, पाटण, ओंढोली, मुंढावरे आणि पाथरगाव – २१ जुलै, पिंपळोली, कुणेनामा, ताजे, सदापूर आणि वाकसाई – २५ जुलै, कडूस (ता.,खेड), पौड, (ता.मुळशी), किकवी (ता.भोर), सांगरूण (ता.हवेली), राहु (ता.दौंड), पाबळ, न्हावरा (ता.शिरुर) – २६ जुलै


