March 30, 2026

यवत प्रतिनिधी नवनाथ वेताळ

                  पुणे सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात ट्रक , कंटेनर व पिकप चा तिहेरी अपघात झाला आहे, या अपघातामध्ये पिकप मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर कंटेनर चालक जखमी आहे. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोघांचा जागेवर मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी ता ३ सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली,
                सुनील नवनाथ जाधव वय 27 वर्ष राहणार (भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे ) व विजय चिल्या भिल राहणार ( मराठी शाळेच्या पाठीमागे शिंदावणे गाव तालुका हवेली जिल्हा पुणे , मूळ राहणार आद्रत भैयडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार )असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघाची नावे आहेत. तर कंटेनर चालकाचे नाव अद्याप कळू शकले नाही, सुनील जाधव हा पिकअप चालक असून , विजय हा मजुरीचे काम करीत होता. सुनील जाधव हा पिकप मध्ये उसाचे वाडे घेऊन पुण्याच्या बाजूला निघाला होता त्याच्या बाजूला विजय हा बसलेला होता शनिवारी सकाळी उसाचे वाडे घेऊन जात असताना इनामदार वस्ती परिसरात एक कंटेनर ट्रक महामार्गावर वळण घेण्यासाठी थांबला होता पुण्याकडे जाताना अचानक ट्रक थांबल्याने सुनीलचा पिकप वरील ताबा सुटला व पिकअप समोरील ट्रकला जाऊन जोरात धडकला,
               या अपघातात पिकप मधील सुनील व विजय यांचा जागेवरच मृत्यू झाला तर पाठीमागून आलेल्या कंटेनर चालक पिकअप ला धडकल्याने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, अपघात एवढा भीषण होता की त्यामुळे पूर्ण सोलापूर हायवे पूर्णपणे ट्राफिक जाम झाल होत. उरुळी कांचन मधील पोलिसांनी तत्परता दाखवून घटनास्थळी धाव घेतली आणि वाहने रस्त्याच्या बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना उपचारासाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.