शिरूर प्रतिनिधी
ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी (तालुका शिरूर) ने रोडच्या दुतर्फा लावलेल्या झाडांच्या संवर्धनाचे काम जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने निमगाव म्हाळुंगी चे विद्यमान सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी सरपंच काळे यांनी मागील काही महिन्यापूर्वी केलेले वृक्षारोपनामधील काही झाडे वाकली होती, तसेच काही झाडे ही वाकून पडलेली होती. त्या वाकलेल्या झाडांची निगा राखण्याचे काम ग्रामपंचायत ने केले आहे. लावलेली झाडे खात्रीशीर जगवण्याचा प्रयत्न आहे असे सरपंच बापूसाहेब काळे सांगितले.
सरपंच काळे यांनी या उपक्रमाचे उदघाटन जमिनीवर वाकलेल्या आणि पडलेल्या झाडांना दोरीच्या आणि लाकडाच्या साह्याने त्या झाडाला बांधून केले.तसेच पुढील सामाजिक कार्यकर्ते बाबुराव चौधरी यांच्या माद्यमातून सर्व झाडांना टॅग लावायचे काम पूर्ण करण्यात आले आहे असे सरपंच काळे यांनी सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबुराव चौधरी,आबा चव्हाण आणि विष्णू धोत्रे, कुणाल काळे, उपस्थित होते.
