लोणीकंद प्रतिनिधी
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला पाठींबा देण्यासाठी बुधवार दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी लोणीकंद गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने गाव बंदची हाक दिली आहे.
लोणीकंद गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने लोणीकंद पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून बुधवार दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी बंदचे आयोजन केले असुन या बंद मध्ये सर्व व्यापारी बांधव यांनी स्वयंस्फुर्तीने आपले सर्व बाजार पेठ बंद ठेवण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
माहे फेब्रुवारी मध्ये राज्याच्या विशेष अधिवेशनात सर्व आमदार प्रतिनिधी यांनी सगेसोयरे या विषयी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यास साथ देण्याचे सर्व आमदार यांना सकल मराठा समाजाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे गॅजेटचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी तसेच त्याची अंमलबजावणी करुन कायद्यात रुपांतर करण्यात यावे यासाठी कायद्यात रूपांतर झालेल्या पूर्ण प्रक्रियेचा जी. आर. काढण्यात यावा या साठी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे सर्वांनी १०० टक्के % बंद पाळण्यात यावा यासाठी जाहीर आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या आपल्या बांधवांना पाठबळ देण्यासाठी बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन लोणीकंद ग्रामस्थ व सकल मराठा समाजाचे वतीने करण्यात आले आहे.
