मांडवगण फराटा-प्रमोल कुसेकर
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवगण फराटा येथील फिर्यादी महिलेच्या पतीला सन 2017 साली अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पैशाची गरज होती. त्यावेळी गावातील सावकार भानुदास फराटे यांच्याकडुन सदर महिला व तिच्या मुलांनी दि. 24 नोव्हेंबर 2017 रोजी 7 लाख रुपये प्रतिमाह 4 रुपये टक्याने घेतले होते. रक्कमेकरीता सिक्युरिटी म्हणुन भानुदास यानी फिर्यादी महिलेचा मुलगा याच्याकडुन मांडवगण फराटा येथील बॅंक ऑफ बडोदा शाखेचा सही केलेला 1 चेक त्यावर 5 लाख एवढी रक्कम नमुद केली होती. तसेच फिर्यादी महिलेचा दुसरा मुलगा याच्या नावावर मांडवगण फराटा येथील जिजामाता सहकारी बँकेच्या शाखेचे 2 सही केलेले कोरे चेक आणि 100 रूपयांच्या स्टॅम्पपेपरवर सिक्युरीटी पोटी लिहून घेत
ले.तसेच फिर्यादी महिलेकडून मांडवगण फराटा येथील त्यांच्या मालकीची 11 गुंठे शेतजमिन खरेदीखत करुन लिहुन घेतली. त्यांनतर सदर खरेदीखत पैसे परत दिल्यानंतर रदद करुन देण्याचे मान्य केले. व्याजाने घेतलेली मुद्दल 7 लाख रुपये हि रक्कम फिर्यादी महिला आणि तिच्या दोन मुलांनी रोख स्वरुपात वेळोवेळी भानुदास यास दिलेले आहेत. सन डिसेंबर 2017 पासुन ते आजतागायत 04 टक्के प्रतिमाह प्रमाणे 14 लाख रुपये व्याजापोटी दिलेले आहेत. असे असतानाही भानुदास याने सदर कुटुंबाकडे अधिक पैशांची मागणी करत 12 लाख रुपये मागितले. आणि ते न दिल्यास खरेदीखत पुन्हा रद्द करुन देणार नाही असे म्हणत फोनवर शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.


