शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
वाबळेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेतील तीन विद्यार्थ्यांची
जवाहर नवोदय प्रवेशासाठी निवड झाली असून शाळेने यशाची परंपरा कायम राखली
आहे.
नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पेढे भरवून
आनंद व्यक्त करताना शिक्षक व उपस्थित मान्यवर.(छाया : नमीरा डिजीटल)
प. प्राथमिक शाळेतील आदित्य चिंतामण परदेशी, पुनम संतोष साठे व करण तुकाराम
सातपुते यांची नवोदय विद्यालयसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना गोरख
काळे व प्रतिभा पुंडे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व
मार्गदर्शक शिक्षकांचा ग्रामस्थानी सन्मान केला. तसेच एकमेकांना पेढे भरवून
आनंद व्यक्त केला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा
वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, केशव
वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल
पवार, उपमुख्याध्यापिका शरीफा तांबोळी, एकनाथ खैरे, सुनील पलांडे, जयश्री
पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे,
पोपट दरंदले, संदीप गीते, विद्या सपकाळ, सचिन बेंडभर आदी उपस्थित होते.
नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या वतीने इयत्ता
सहावी ते बारावी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिक्षण तसेच राहण्याची व
जेवणाची सोय अगदी मोफत होणार असून या विद्यार्थ्यांची सीबीएसई बोर्डाची
दहावी व बारावी परीक्षा होणार आहे. वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल
केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे,
गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे
अभिनंदन केले.


