March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
             ज्या कुटुंबाचं उत्पन्न ८ लाखांहून कमी आहे अशा मुलींना येत्या जून पासून मोफत शिक्षण देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी केली. मुलींना मेडिकल, इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या तब्बल ६०० पेक्षा जास्त अभ्यास क्रमांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे.

मुलींना मोफत शिक्षण देणार

           आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच, आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येणार आहे. 
              येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील, यासाठी विशेष अभियान राबवावे, अशा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तसेच सीईटी परीक्षेचे वेळापत्रक नियोजित केल्याने यावर्षी एक ही प्रवेश परीक्षेच्या वेळेत बदल करावा लागला नाही, त्याच धर्तीवर विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून निकाल वेळेत जाहीर करावेत, असंही चंद्रकांत पाटील या वेळी बोलताना सांगितलं.
राज्यातील मुलींच्या शिक्षणात वाढ होण्यासाठी राज्य सरकार सध्या आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं सांगण्यात येत आहे. 
               जर्मनी, जपान, इस्रायल या देशांना भारताकडून कुशल मनुष्यबळाची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यातील कौशल्यावर आधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालवण्यावर आता भर देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी कार्य करण्यासाठी विद्यापीठाच्या कुल गुरुंना आवश्यक त्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.