March 30, 2026
प्रतिनिधी संदीप ढाकुलकर शिरूर
            पुणे वरून नगर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने अचानक सकाळी पाचच्या सुमारास पेट घेतला अशी माहिती सूत्रातून मिळाली आहे शिरूर बायपास वर हॉटेल आर के जवळ सकाळी महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत युद्ध पातळीवर आग वीजवण्याचे कार्य केले. सूत्रानुसार यामध्ये कोणती जीवित हानी झाली नाही. सदर आगी मुळे शिरूर नगर रोडवरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती.   

                या घटनेमुळे शिरूर शहरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून ही बस राज्य परिवहन महामंडळाची असून त्यामधून ऑइलचे बॅरल वाहतूक करण्यात आली होती, ज्वलनशील पदार्थाच्या वाहतुकीमुळे अचानक बसने पेट घेतल्यामुळे आगीने तीव्र स्वरूप धारण केल्यामुळे संपूर्ण बस आगी मध्ये जळून खाक झाली आहे, अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही,