March 30, 2026
ब्रेकिंग…! वाघोलीत रिक्षा चोर पकडला दोन रिक्षा हस्तगत

ब्रेकिंग…! वाघोलीत रिक्षा चोर पकडला दोन रिक्षा हस्तगत 

सुनील भंडारे पाटील

वाघोली (तालुका हवेली) येथे रिक्षा चोरून पुणे नगर महामार्गावर शिप मध्ये चालवणारा रिक्षा चोर पकडला असून त्याच्याकडून दोन रिक्षा हस्तगत करण्यामध्ये वाघोली ट्रॅफिक पोलिसांना यश मिळाले आहे,

याबाबत वाघोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजेंद्र जाधव हा मुंबई येथील वेगवेगळ्या भागातून रिक्षा चोरून त्या रिक्षा वाघोली परिसरामध्ये पुणे नगर महामार्गावर पॅसेंजर वाहतुकीसाठी रिक्षा चालकांना शिफ्टवर देत असे ही बाब गेल्या अनेक महिन्यापासून चालू होती,

परंतु कितीही तरी शातिर चोर असला तरी तो पोलिसांच्या जाळ्यात सापडतोच याप्रमाणे पोलिसांच्या ऑनलाइन ट्रॅफिक चलन सुविधे अंतर्गत या चोरीच्या रिक्षा वाघोली मध्ये रस्त्यावर फिरत असताना ट्रॅफिक पोलिसांनी या रिक्षावर ट्रॅफिक चलन टाकले याचा परिणाम असा की या चलनाचा मेसेज मूळ मालक राहणार मुंबई डोंबिवली येथे त्यांच्या मोबाईलवर गेला यावरून त्यांना समजले की संबंधित रिक्षा या वाघोली भागात आहेत,

रिक्षा मालकाने तातडीने ही माहिती डोंबिवली पोलिसांना दिली, त्या अगोदरच डोंबिवली पोलिस स्टेशनमध्ये रिक्षा चोरिची तक्रार येथे दाखल करण्यात आली होती, या माहितीच्या आधारित तपासासाठी पोलीस कॉन्स्टेबल चौधरी, राजेंद्र सोनवणे हे वाघोली येथे आले असता त्यांना तक्रारीमध्ये नोंद असणाऱ्या MH03BN6354,MH05DL5890 रजिस्टर नंबरचे या रिक्षा सापडल्या, तसेच या चोरून आणलेल्या रिक्षा आरोपी राजेंद्र जाधव याला ताब्यात घेण्यात आले, पुढील तपास डोंबिवली पोलीस करत आहेत, अशी माहिती पुणे शहर वाघोली ट्रॅफिक पोलीस जितेंद्र पवार यांनी दिली,

पुणे नगर महामार्गावर अजूनही अशा अवैध चोरून आणलेल्या रिक्षा फिरत असतील अशा रिक्षा देखील पोलीस पकडतील का असा प्रश्न जनतेतून विचारला जात असून ट्रॅफिक पोलिसांना हे एक मोठे चॅलेंज आहे,