March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
         आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकार फक्त मजा बघत असल्याची टीका केली आहे. माझा जीव गेला तर दुसरी श्रीलंका महाराष्ट्रात होईल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

           यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावण्यात येणार होते. पण 15 तारखेच अधिवेशन 20 तारखेला घेण्यात येणार आहे.

असे सांगत सरकार दुर्लक्ष करत आहे का असा सवाल उपस्थित केला.
          मराठ्यासांठी जीव गेला तरी चालेल पण मी माझ्या भुमिकेवर ठाम असल्याचे जरांगे पाटील सांगितले. माझा जीव गेला तर  श्रीलंके सारखी परस्थिती  महाराष्ट्रात होईल असा इशारा ही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
पाचव्या दिवशीही मनोज जरांगे पाटील यांचा उपचारास नकार
उपोषणाच्या पाचव्या दिवशी ही जरांगे पाटील यांनी उपचारासाठी नकार दिला. आज  सकाळी जालना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नेतृत्वा खालील पथक मनोज जरांगे यांच्या तपासणीसाठी आले होते.
         या डॉक्टरांच्या पथकाने मनोज जरांगे यांच्याकडे आरोग्य तपासणीसाठी आग्रह केला. पाटील तपासणी करू द्या, उपचार घेवू नका पण तपासणी तरी करू द्यावी अशी विनंती केली. मात्र आधी सरकारला सगे सोयरे कायदा करा, त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे यांनी डॉक्टरांच्या पथकाकडे केली. त्यानंतर हे डॉक्टरांचं पथक माघारी गेले.