March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
            मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. नवी मुंबईतील वाशी येथे सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाचा कायदा करावा तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करत ते गेल्या 4 दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत.

            जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 5 वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्या मुळेच सरकारी अधिकारी जरांगे यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जरांगे यांनी कुठलीही तडजोड केली जानार नाही आधी मागण्या पूर्ण करा अन मगच माझ्याकडे या अशी भूमिका घेतली आहे.

             शिंदे फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. 15 तारखेचे अधिवेशन 20 पर्यंत पुढे का ढकलले असा सवाल करून जरांगे यांनी राजकारण्यांना नीच असा शब्द वापरला आहे. याचबरोबर उद्याच्या उद्या सगेसोयरे असा शब्द असलेला आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी ही केली आहे. यावेळी त्यांची समजूत घालण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी इथून निघून जाण्यास सांगितलं.
जरांगे यांची समजूत घालण्यासाठी अधिकारी आले होते तेव्हा, काय आणलंय काय नाही ते बघायचं तरी असे म्हणत अधिकाऱ्याने आपली भूमिका मांडली. 31जानेवारी 2024 पर्यंतचे शासकीय राजकीय गुन्हे माघारी घेण्याच्या अध्यादेश कमिटीला त्यांनी मुदतवाढ दिलीय. तुमची काल पर्यंतची जी मागणी ती दिली ना त्यांनी कमिशनर ही इथे आले आहेत.
            असे संबंधित अधिकारी म्हणताना दिसून येत आहे. त्यावर, जरांगे संतापले असून तुमच सरकार पाशी वजन बसाव म्हणून मोठेपण सांगताय का, गुन्हे मागे घेतले का ते सांगा?असा सवाल जरांगे यांनी विचारल. त्यानंतर, यात सरळ सरळ लिहिलंय की गुन्हे मागे घेतले जातील असे अधिकारी म्हणत आहेत. त्यावर घेतले जातील का घेतले आहेत? असा प्रति प्रश्न जरांगे यांनी केला आहे. शेण खातो का मी उठा इथून… अरे उठा इथून फसवताय का मराठ्यांना असे म्हणत मनोज जरांगे त्यांना समजवण्यास आलेल्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याच दिसून आलं.