सुनील भंडारे पाटील
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राजपत्रामधील अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या 10 तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, आज पाच दिवस नंतर देखील जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम असून, विशेषतः पाण्याचा त्याग केल्याने त्यांची तब्येत अतिशय खलावली आहे, आज त्यांच्या नाका मधून रक्तस्राव होऊ लागला आहे, अतिशय गंभीर परिस्थिती आहे,
आरक्षणासाठी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी जरांगे पाटील यांचा लढा एक ऐतिहासिक लढा ठरत आहे, काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराटी येथून राज्याची राजधानी मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, मुंबईपर्यंत पोहोचताच या मोर्चाचे रूपांतर मोठ्या जनसागरामध्ये झाले होते, ही परिस्थिती पाहताच राज्य सरकारला घाम फुटला होता, राज्य सरकारने कुट नीतीचा उपयोग करून वाशीमध्येच मोर्चा थांबवला,
परंतु जरांगे पाटील काही थांबणार आहेत का, त्यांनी गेल्या 10 तारखेला पुन्हा आमरण उपोषण सुरू केले, आज उपोषणाचा पाचवा दिवस, जगाच्या पाठीवर असे उपोषण कोणी करू शकत नाही, ते जरांगे पाटलांनी करून दाखवले अक्षरशः त्यांनी पाणीदेखील वर्ज केले, छत्रपती शिवरायांच्या विचारांनी, तसेच मराठ्यांच्या हितासाठी पेटलेला हा माणूस आरक्षण घेऊनच राहणार, अशी परिस्थिती तयार झाली आहे, पाणी घेण्यासाठी लाखो लोक विनंती करत आहेत, आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना पाणी पिण्याची विनंती करत आहे, परंतु ते अन्नपाणी घेण्यास नकार देत आहेत, आज अक्षरशा त्यांच्या नाका मधून रक्तस्राव होऊ लागला आहे, परिस्थिती खूप गंभीर आहे, राज्य सरकारने आता अजून परीक्षा घेऊन ये, राजपत्रातील अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे,
