March 30, 2026
सुनील भंडारे पाटील
             धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक व श्रीक्षेत्र तुळापूर येथील महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्या साठी एकूण ३९८ कोटी रुपये मंजूर, त्यापैकी २७० कोटी विकास कामाचे भूमिपूजन समारंभ सोहळा श्रीक्षेत्र वड बुद्रुक व श्रीक्षेत्र तुळापूर या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला,

               तीनही मंत्र्यांचे हेलिकॉप्टर द्वारे प्रथमता वढू बुद्रुक येथे आगमन झाले, यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती, हिंदुस्तानची दुसरी धर्म पंढरी समजल्या जाणाऱ्या वढु बुद्रुक येथे समाधी स्थळी, शंभूराजे समाधी, पुतळा, कवी कलश समाधीचे पूजन करून भूमिपूजन करण्यात आले, त्यानंतर तुळापूर येथे समाधी स्थळी पूजन करून नवीन विकास आराखड्याचे विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले, तुळापूर येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते,

                  समाधी स्थळाचा विकास व आपण करत असलेले आजचे भूमिपूजन ही खरोखर भाग्याची बाब आहे, शंभूराजांनी असह्य वेदना सहन करत धर्मासाठी बलिदान दिले, समाधी स्थळ हे गौरव स्थान झालं पाहिजे त्यासाठी आम्हाला नवीन सरकार स्थापन करावा लागले, भव्य दिव्य स्मारक होण्यासाठी आपल्याला निधीदेखील वाढवावा लागला, समाधी स्थळ हे आपल्यासाठी तीर्थक्षेत्र आहे, शंभू राजांचा पराक्रम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे आहे, वडू बुद्रुक आणि तुळापूर ही दोन्ही समाधीस्थळे महाराजांचा लौकिक असणारी आहेत, आणि म्हणून या दोन्हीही समाधी स्थळांचा विकास करणे आपले कर्तव्य आहे,छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पाय भरणी केली, तर शंभूराजांनी स्वराज्याचा कळस उभारला, संभाजी राजांनी आपल्या जीवनात 120 लढाया केल्या, परंतु एकही लढाई ते हरले नाहीत अशा राजाच्या समाधी स्थळाची विकास करणे आपले आद्य कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितले,
                   यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी देखील आपल्या भाषणांमधून शंभूराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, पुणे पोलीस खात्याच्या वतीने मोठा फौज फाटा तैनात करून बंदोबस्त ठेवण्यात आला होता, शांततेत पार पडलेल्या भूमिपूजन समारंभामध्ये लाखो शंभूभक्तांनी उपस्थित राहून या सुवर्ण क्षणाची शोभा वाढवली,