March 30, 2026
व्यंकटेश कृपा शुगर मिल्सचे वर्क्स मॅनेजर तुषार निघुते यांना विस्माचा उत्कृष्ट वर्क्स मॅनेजर पुरस्कार 

व्यंकटेश कृपा शुगर मिल्सचे वर्क्स मॅनेजर तुषार निघुते यांना विस्माचा उत्कृष्ट वर्क्स मॅनेजर म्हणून पुरस्कार 

सुनील भंडारे पाटील

सदर कारखाना पारितोषिक स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता कारखान्याने विविध विषयाबद्दलचा समर्पक व सुयोग्य अहवाल विस्माकडे सादर केला होता, सदर स्पर्धेच्या मूल्यांकन समितीने विस्मा पारितोषिकांची सर्वकश मूल्यांकन करून पारितोषिक जाहीर केले

सदर कारखान्यातील उत्कृष्ट वर्क्स मॅनेजर(Excellent Works Manager) या पदावरील तुषार नानासाहेब निघुते या अधिकाऱ्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचे या विषयाचे प्रथम पारितोषिक साठी निवड करण्यात आली,

सदर पारितोषकांचे वितरण राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ जी बागडे व केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे शुभ हस्ते व राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी वेस्ट इन हॉटेल कोरेगाव पार्क पुणे येथे संपन्न झाला,

सदर प्रसंगी व्यंकटेशकृपा शुगर मिल्सचे चेअरमन माननीय संदीप  तोर जनरल मॅनेजर किरण दोरगे डेप्युटी जनरल मॅनेजर विवेक सोनवणे संचालक मंडळ कामगार व पारितोषिक विजेते तुषार निघुते यांचे वडील आई पत्नी व कुटुंबीय सदस्य उपस्थित होते इतर साखर कारखान्यातील व परिसरातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले,

Loading