March 30, 2026
पुणे मनपा ते केंदूर बस सेवा पुढे पाबळ पर्यंत वाढवावी पाबळ ग्रामस्थांची मागणी

पुणे मनपा ते केंदूर बस सेवा पुढे पाबळ पर्यंत वाढवावी पाबळ ग्रामस्थांची मागणी

सुनील भंडारे पाटील
पुणे म. न. पा. (भवन )ते कोरेगावभीमा -केंदूर या बस मार्गाचे पाबळगांव पर्यंत रूट वाढवावा, सध्या न ता. वाडी. आगाराची बस क्रमांक 162 ही बस म. न. पा. (भवन )ते कोरेगावभीमा मार्गे केंदूर या ठिकाणी चालू आहे.
परंतु केंदूर गावावरून पाबळ गावपर्यंत येण्या जाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. म्हणून या बसचा रूट वाढवून पुढे ही गाडी पाबळ पर्यंत सोडावी अशी मागणी केंदूर पाबळ ग्रामस्थ करत आहेत,
S. T. बस बंद होऊन 33 वर्ष झाली आहेत. शिवाय पाबळ गावाची लोकसंख्या 10 ते 15 हजार असून केंदूर ते पाबळ हे अंतर फक्त 6किमी. आहे.पाबळ ला येण्याची वाजेवाडी, चौफुला, पऱ्हाडवाडी, सुक्रेवाडी, ताठेमळा, केंदूर, थिटेवाडी या ठिकाणच्या विद्यार्थी -विद्यार्थीनी, कामगार वर्ग, वृद्ध, जेष्ठ नागरिक, रुग्ण, बाजार करण्यासाठी येणाऱ्या महिला यांची अतिशय गैरसोय होत आहे.
त्याचप्रमाणे बस म. न. पा. (भवन ) ते केंदूर ला आल्या नंतर पाबळला जाण्यासाठी इतर कोणतीही वाहन सुविधा उपलब्ध नाही. याचा परिणाम असा होतो की या लोकांना महाविद्यालय हायस्कूल, विद्यार्थी -विद्यार्थीनीना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागते.
तसेच केंदूर या ठिकाणी प्रमुख आरोग्य केंद्र आहे. तेथेही जाण्यासाठी गैरसोय होते. यासाठीच कृपया आम्ही समस्त ग्रामस्थ पाबळ, ग्रामपंचायत पाबळ, श्री पदम मनी जैन महाविद्यालय पाबळ, जैन स्वेता बर तीर्थ पेढी पाबळ, जैन इंग्लिश मेडीयम स्कूल पाबळ, विज्ञान आश्रमपाबळ, सर्व महिला बचत गट संघटना(नारी शक्ती )पाबळ विद्यार्थी, विद्यार्थीनी, वृद्ध, जेष्ठ नागरिक, कर्मचारी वर्ग यांच्यावतीने सहानुभूती पुर्वक विचार करून बस क्रमांक 162 म. न. पा.(भवन )ते कोरेगावभीमा केंदूर मार्गे पाबळगाव Murphy  या ठिकाणी बस सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत असून या मागणीची लेखी स्वरुपात निवेदन  व्यवस्थापक P. M. P. L. पुणे. शंकरशेठ, रोड, स्वारगेट, पुणे यांना देण्यात आले आहे,