March 30, 2026
वाघाळेत दारू व्यवसायिक व पोलीस यांच्यात लपाछपी

वाघाळेत दारू व्यवसायिक व पोलीस यांच्यात लपाछपी,

भर दिवसा दारू पिऊन रस्त्यावर झोपलेला तळीराम छायाचित्रात दिसत आहे,

सुनील भंडारे पाटील

वाघाळे (तालुका शिरूर) येथे ग्रामस्थांची तक्रार असताना सदरील कारवाईसाठी रांजणगाव गणपती पोलीस कारवाईसाठी आले की, दारू धंदा बंद, व्यावसायिक फरार, पोलीस गेले की दारू धंदा चालू, अशा स्वरूपाचे वातावरण दारू व्यावसायिक व पोलिसांमध्ये चालू आहे, त्यामुळे दारू व्यवसाय व पोलिसांमधील चाललेला हा लपाछपीचा खेळ याबाबत परिसरात जोरदार चर्चेला उधाण आले आहे,

याबाबत माधुरी थोरात, मनीषा थोरात, प्रशांत थोरात यांनी स्थानिक ग्रामपंचायत व रांजणगाव पोलीस स्टेशन यांना लिखित स्वरूपात निवेदन दिली असून वाघाळे येथे गेली ५ते ६ वर्षापासन बेकायदेशीरपणे दारू विकी चालू आहे.या बाबत अनेक वेळा ग्रामस्थांनी व महिलांनी गावातील दारूबंदीसाठी प्रयत्न केले आहेत , परंतु भरत आनंदराव थोरात व शिला भरत थोरात हे कोणालाही न जुमानता बिनधास्त पणे रहात्याघरी बेकायदेशीरपणे दारू विक्री करत आहे,

सदर दारू विक्री पासून थोडयाच अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उच्च माध्यमीक विदयालय असून दारू विकणाऱ्यांचा व पिणाऱ्यांचा त्रास शाळेतील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे,

वाघाळे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वाती सचिन थोरात या ग्रामपंचायत सेवक म्हणून कार्यरत असल्यामुळे ग्रामपंचायत त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही दारू विकी करणारी सदर व्यक्ती सांगते की पोलीस स्टेशन व प्रशासन हे माइया खिशात आहे . गावातील कोणी ग्रामस्थ त्याच्या विरोधात तक्रारीसाठी पुढे आले की.

त्यांच्यावरच सदर महिला शिल्पा भरत थोरात हे विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी देतात असा प्रकार गावमध्ये गेली ५ ते ६ वर्षापासून चालू आहे. अशा आशयाचा व मजकुराचे दारूबंदीसाठीचे निवेदन ग्रामपंचायत वाघाळे, तसेच रांजणगाव गणपती पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे,

या निवेदनाची दखल घेऊन रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस वाघाळे गावात कारवाईसाठी आले असता अगोदरच दारू धंदा बंद, धंदा करणारे व्यावसायिक फरार, पोलीस येऊन गेले की, पुन्हा दारू धंदा चालू हे गुपित काय असा प्रश्न ग्रामस्थ व पंचक्रोशीला पडला आहे, एकंदरीत दारू व्यावसायिक व रांजणगाव गणपती पोलीस स्टेशन पोलीस यांच्यातील चाललेला हा लपाछपीचा खेळ याविषयीची चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे,

वाघाळे गावांमधील चाललेला हा अवैध दारू धंदा व्यवसाय याची पोलीस खात्याने वरिष्ठ स्तरावर विचार करून तातडीने कारवाई करावी व सदरील दारू व्यवसाय तातडीने बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे,