March 30, 2026
सदनिका ताब्यात द्या अन्यथा आमरण उपोषण व आत्म दहणाचा इशारा

रस्ता बाधितांना सदनीकां ताब्यातदया अन्यथा १ ऑगस्ट पासून पुणे मनपा समोर आमरण उपोषण व आत्मदहनाचा इशारा

सुनील भंडारे पाटील 

पुणे नगर राष्ट्रीय महामार्ग व व्ही.आय.पी.एअरपोर्ट रस्ता रुंदीकरणात सिद्धार्थनगर सर्वे नं २०४ व २०५ मधील १६९ बाधिक कुंटुंबांची घरे व दुकाने पाडण्यात आली होती.

रस्ता बाधितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पुणे महानगर पालिकेची असताना खाजगी विकसकाला हाताखाली धरून खुळेवाडी येथे पत्र्यांच्या शेडमध्ये निकृष्ट सोई सुविधा असलेल्या ट्रान्जीट कॅप मध्ये १६९ कुंटुंबाना ठेवण्यात आले.

परिणामी वीस वर्षात शेकडो आत्महत्या करून मेले, रोजगार गेला, शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ आदि सुविधा पासून वंचित राहील्याने शेवटचा पर्याय म्हणूण पूणे महानगर पालिकेवर मोर्चा चढवला.

बेघर, भूमिहीन, मागासवर्गिय व आर्थिक दुर्बल घटकातील रस्ता बाधितांना पुनर्वसनाचा हक्क दया ही मागणी घेऊन ॲङ बी.एम रेगे व अँड पल्लवी रेगे यांचे नेतृत्वाखाली बाधितांची मोर्चा बांधनी केली,

ज्या पध्दतीने पुणेनगर रस्ता रुंदीकरनासाठी तीस वर्षा पूर्वी अँड बी.एम. रेगे यांनी रामवाडी परिसरात लोक चळवळ उभा केले त्या नंतर रस्ता रुंदीकरण झाले होते,

त्याच पद्धतीने रस्ता बांधितांच्या हक्कासाठी पुणे महानगर पालिकेच्या जबाबदार अधिकारी व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांचेकडे मोर्चे बांधणी केली.

पुणे मनपाचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त उपायुक्त ओम प्रकाश दिवटे, उपायुक्त मालमत्ता व व्यवस्थापण वसुंधरा बारवे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे व सनिश कुमार खडके, मनपा सहा. आयुक्त शितल वाकडे आदिंच्या बाधितांचा शिष्टमंडळासोबत बैठका करून प्रलंबित पुनर्वसनाचा कामाला वेग देण्यासाठी जोर धरला,

१६९ बाधितांपैकी पहिल्या टप्यात १०२ कुंटुंबांचे पुनर्वसन पुणे मनपाच्या ताब्यातील न्याती इलेसिया खराडी येथे ५३ सदनिका, रिवायडल खराडी येथे १९ सदनिका व न्याती वडगांवशेरी येथे 30 सदनिकांना मंजुरी व निवड प्रकिया पूर्ण झाली असून त्या सर्व सदनिकाचा ताबा ताबडतोड बाधितांना द्यावा व उर्वरीत ६७ बाधितांची पात्रतेची प्रक्रिया पूर्ण करून त्यांचेही पुनर्वसन करावे अन्यथा दि. १ ऑगष्ट पासून पुणे मनपाच्या दारात आमरण उपोषण व आत्म दहणाया इशारा लिखीत स्वरूपात दिला आहे.

बाधितांच्या वतीने घरजमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष अँड. बी.एम रेगे, संतुलन कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या संस्थापिका अध्यक्षा अँड. पल्लवी रेगे,

साहिल गायकवाड, रणजित अवधूत, मार्शल गायकवाड, कविराज प्रधान, उत्तम डोळस, मिना ओझरकर, मिना हंचनमानी, सुनील वडमारे,

उद्धव डोळस, मधुकर डावकर आदिं बरोबर शेकडोंच्या संख्येने बाधितांनी स्वस्फुर्तीने पुढाकार घेतला आहे.

 

ठळक घटनाक्रम:

– पुणे नगररस्ता रुंदीकर नासाठी लढा १९९५

– नगररस्ता व व्ही.आय.पी ऐअरपोर्ट रस्ता रुंदीकरण सन २००७-०८ मध्ये

– मनपाने सनदिका देऊ केल्या २०२३

– बाधितां कडून सदनिकाची पसंती २०२४

– नगर ‘विकास विभाग मंजुरी २०२५

– पुणे मनपा कडून १०२ बाधित कुदुंबांना सदनिका वाटप करण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, उप आयुक्त परिमंडळ क्र.१ पुणे मनपा, सहा. आयुक्त, नगरोड क्षेत्रीय कार्यालय, मनपा पुणे यांना दि ४ जुन २०२५ रोजी आदेश.

– रस्ता बाधितांकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दि. २४ जुलै २०२५ रोजी वयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर

– सदनिका ताब्यात द्या अन्यथा दि. ऑगस्ट पासून आमरण उपोषण व आत्म दहणाचा इशारा.