HomeUncategorizedचेक बाउन्स मध्ये सहा महिने कैद,दंड शिरूर न्यायालयाचा निकाल 

चेक बाउन्स मध्ये सहा महिने कैद,दंड शिरूर न्यायालयाचा निकाल 

सुनील भंडारे पाटील : आता कोणालाही व्यवहारात चेक देऊन बाउन्स करणे सोपे राहिले नाही, याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल हे शिरूर न्यायालयाने सिद्ध केले असून चेक बाउन्स प्रकरणात नुकताच शिरूर न्यायालयाने निकाल दिला असून त्यामध्ये आरोपीला एक वर्षाची कैद व रोख स्वरूपात दंड आकारणी करण्यात आली आहे,

वढू बुद्रुक (तालुका शिरूर) पुनर्वसन गावठाण येथील संदीप शांताराम सावंत वय 32 वर्ष या आरोपीला शिरूर न्यायालयाने चेक बाउन्स प्रकरणी एक वर्षाची कैद व 257850 रुपये दंड आकारला आहे,

तक्रारदार राहुल नारायण दिघे वय 28 वर्ष राहणार गणेगाव रोड कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी शिरूर न्यायालय मध्ये फिर्याद दाखल केलेली होती, या प्रकरणात संदीप सावंत यांनी व्यवसायासाठी दिघे यांच्याकडून दीड लाख रुपये रोख रक्कम घेतलेली होते पाच महिन्यात परतफेड करण्याच्या बोलीवर घेतलेली ही रक्कम या कालावधीत परत न देता चेक दिला,  हा चेक दिघे यांनी आपल्या बँकेमध्ये भरला असता संबंधित चेक न वाटता बाउंस होऊन परत आला, या संदर्भात कलम 138 अन्वये प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी शिरुर न्यायालय मध्ये रक्कम वसुलीसाठी दावा दाखल करण्यात आला, साक्षी,पुरावे तपासणी उलट तपासणी करत अखेर शिरूर न्यायालय प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांनी निकाल दिला, न्यायालयाच्या आदेशानुसार सावंत याला पकड वॉरंट जारी करत न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यानंतर सावंत याची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली, वारंट जारी करून कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित मांजरे यांनी कार्यवाही केली, शिरूर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दत्तात्रय बी डोमाळे यांनी हा निकाल दिला आहे, फिर्यादीच्या बाजूने वकील यु जे सरोदे यांनी कामकाज पाहिले,

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!