March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
              तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत बुधवार हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.     

हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्यद्यापिका  सुनिता पिंगळे व हिंदी विभाग प्रमुख शिवाजी आढाव यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनी  सायली मुळे, स्नेहा केदारी, यश भालके, गायत्री दाभाडे या विद्यार्थ्यांनीनी हिंदी दिनाबद्दल तसेच हिंदी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा इतिहासही विद्यार्थ्यांना उलगडून दाखवला व भविष्यकाळात हिंदी भाषा आपण कशी समृद्ध करू याविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा सूर्यवंशी यांनी केले तर उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे यांनी आभार मानले.