विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या नवव्या इन्स्पायर ॲवॉर्ड मानक (INSPIRE AWARD MANAK) प्रदर्शनामध्ये संपूर्ण देशातून ६ लाख ५३ हजार विद्यार्थ्यांनी नाविण्यपूर्ण कल्पना मांडल्या होत्या. त्यापैकी ५५६ विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर निवडले गेले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील ३१ विद्यार्थी सहभागी होते. त्यातुन महाराष्ट्रातील ९ विद्यार्थ्यांची टाॅप ६० मध्ये निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या टिमला राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका डॉ.रत्ना गुजर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. तसेच राष्ट्रीय नवप्रवर्तन संस्था, अहमदाबाद (National Innovation Foundation) मधील समन्वयक पार्थ पवार यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. महाराष्ट्र टिमचे नेतृत्व राज्य विज्ञान पर्यवेक्षक राजू नेब, DIET नाशिकच्या अधिव्याख्याता डॉ.भारती बेलन, DIET अधिव्याख्याता तथा विज्ञान सल्लागार शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूरचे रमेश कोरे व राज्य बाल विज्ञान परिषद ठाणेचे कार्यकारिणी सदस्य प्रसन्न खडसे यांनी केले.

