दिवसाआड या भागात कुठे ना कुठे बिबट्या दिसत असल्याने वनखात्याने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मांदळवाडी , सविंदणे , घोलपवाडी , कोळेकर व लंघेक्स्ती वरील शेतकरी व ग्रामस्थांची मागणी आहे .
काल दुपारी ४ वा.दरम्यान विठ्ठल गेणूजी ढगे यांचे शेतात काम करणारा लोमेश गुलाबराव चौधरी हा ढगेस्थळ येथील शेतात गायीसाठी गवत आणणेसाठी जाताना रस्त्याकडेच्या उसामधून बिबट्याने अचानक झडप घालून पाडले व तोंड कपाळ डोळ्यांखाली व नाकाला ओरबाडले असता लोमेशने हाताने झिडकारता बिबट्या पळाला व लोमेशला लोणीतील दवाखान्यात प्राथमिक उपचार करून मंचरचे ग्रामीण उपजिल्हा रुग्नालयात हलविले . या भागात ४ -५ बिबट्यांचा वावर असून परवाच घोलपवाडी शिवारात फटांगडे दरीत पिकप समोर लाईटला व हॉर्नचे आवाजाला भिवुन पळाल्याची बातमी दिसली . तरी या बिबट्यांचा बंदोबस्त करावा असी मागणी मांदळवाडीचे सरपंच आदक व सविंदणेचे उपसरपंच भाऊसो लंघे यांनी केली आहे,


