March 30, 2026
लोणी काळभोर प्रतिनिधी
      पुणे तालुका – हवेली हडपसर भागात पाच वर्षांपूर्वी झालेल्या मोहसीन शेख खून प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. देसाई याच्यासह २१ साथीदारांची सबळ पुराव्यां अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.   

संगणक अभियंता मोहसीन शेख खून प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई याच्यासह २१ जणांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.संगणक अभियंता मोहसीन शेख (वय २४) याचा हडपसर भागात २ जून २०१४ रोजी खून झाला होता. समाजमाध्यमात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित झाल्यानंतर शेख याचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती.

शेख मूळचा सोलापूरचा रहिवासी होता. तो एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत काम करत होता. शेख हडपसर भागातून निघाला होता. त्या वेळी त्याने टोपी परिधान केली होती. शेख याच्यावर वार करुन त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी संशयावरुन हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई आणि त्याच्या साथीदारांना हडपसर पोलिसांनी अटक केली होती.या प्रकरणात देसाई याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. विशेष न्यायालयाने देसाई याच्यासह २१ साथीदारांची सबळ पुराव्यां अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.