महाराष्ट्राची सर्वात मोठी अस्मिता असणारे तसेच देशाची दुसरी धर्म पंढरी समजली जाणारे धर्मवीर शंभूराजे समाधी स्थळ विकास कामांसाठी राज्य शासन सरसवले असून समाधी स्थळाचा नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, निधीदेखील मंजूर आहे, समाधी स्थळाला जोडणाऱ्या चारही बाजूचे रस्त्यांची कामे चालू आहेत, सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा मार्ग म्हणजे कोरेगाव भीमा ते वढू या रस्त्याचे दोन्ही बाजूने काम झाले आहे, परंतु झेड कंपनी समोरील काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे,
या कंपनीची भिंत अतिक्रमण व कामात अडथळा आणत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत वढु बुद्रुक यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून देखील या कंपनीकडून भिंत हटवली जात नाही, कंपनी अधिकाऱ्यांच्या सततच्या रगीलपणामुळे रस्त्याच्या कामात अडथळा येत असून नागरिकांकडून तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त होत आहे, संबंधित भिंत तातडीने काढावी अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत आहे,

